पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवलाख उंबरे येथे घरफ़ोडी करणा-या त्रिकुटाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांच्या अटकेमुळे तळेगावातील दोन आणि वाकड येथील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रज्वल बाळासाहेब मोढवे वय २० वर्षे, महेश दत्तात्रेय मंगळवेढेकर वय २० वर्षे, गौरव सुरजभान गौतम वय २० वर्षे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते मूळचे मंचर, आंबेगाव परिसरातील आहेत. सध्या हे तिघेही बाळू जाधव यांच्या खोलीत, जाधववस्ती मिडेंवाडी ता.मावळ जि. पुणे येथे रहात होते.
तळेगाव एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीत नवलाखउंब्रे गावात घरफोडी करून अज्ञात चोरटयांनी दोन मोबाईल लांबवले होते. त्याचा तपास सुरू असताना हे आरोपी पोलिसांच्या हाती गवसले.
ही कामगिरी वरीष्ठ निरीक्षक रणजीत सावंत, उपनिरीक्षक पंडीत आहीरे,अनिल भोसले, सहायक फौजदार बाळासाहेब जगदाळे, सिताराम पुणेकर, नाईक ज्ञानेश्वर सातकर, कॉन्स्टेबल स्वराज साठे, कोळेकर, सागर पंडीत, रोशन पगारे, पवार, बनसोडे, होमगार्ड दाभणे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: