पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हे विरुद्ध लांडगे?

 


पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे  हेच उमेदवार असतील असे सांगून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर्गत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, यामुळे भाजपने तात्काळ रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. 

भाजपचे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा भाजपचा विचार आहे. लांडगे यांनीही नुकतेच माध्यमांशी बोलताना , महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे आला व पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारी करण्यास सांगितले तर मी लढण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. 

दरम्यान अमोल कोल्हे निवडून येण्यापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. शिवाजीराव आढळराव पाटील येथून निवडून येत होते. त्यांनीही आपली निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे राहणार की शिंदेसेनेकडे जाणार यावर लांडगे यांची इच्छापूर्ती अवलंबून असणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने कार्यक्रमांची मालिका हाती घेतली आहे. त्याची माहिती देण्यासाठी काल पिंपरीत  झालेल्या पत्रकार परिषदेत  लांडगे यांनी आपली मनिषा बोलून दाखविली.

त्यामुळे त्यामुळे भाजपचा पहिलवान जिंकणार की छत्रपतींची भूमिका साकारणारा कलावंत असा प्रश्न आहे. या सर्व गोंधळात शिवाजीराव आढळराव पाटील तेल लावलेल्या पहिलवानाप्रमाणे निसटून तिकिट मिळवत विजयी होणार का हा ही प्रश्न आहेच!

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हे विरुद्ध लांडगे? पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हे विरुद्ध लांडगे? Reviewed by ANN news network on ६/०८/२०२३ १२:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".