२४ तासात पाऊस केरळात दाखल होणार

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस येत्या २४तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याची  सुखद बातमी हवामानखात्याने दिली आहे. मात्र, बिपोरजॉय वादळाचा प्रभाव कमी होईपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असणार आहे.

केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे केरळमध्ये उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी केरळमध्ये पाऊस दाखल होत असतो. पण यंदा तो लांबला आहे.

बिपोरजॉय  चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपोरजॉय  चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल असे हवामानखात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

२४ तासात पाऊस केरळात दाखल होणार २४ तासात पाऊस केरळात दाखल होणार Reviewed by ANN news network on ६/०८/२०२३ १०:५०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".