आर्ट फाऊंडेशन आयोजित 'सावली' सामूहिक कला प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

 


सिपोरेक्स माध्यमातील कलाकृती ठरले आकर्षण  !

पुणे : आर्ट फाऊंडेशन  तर्फे बालगंधर्व कला दालन येथे आयोजित 'सावली' या सामूहिक कला प्रदर्शनाचे उदघाटन १ जून रोजी झाले. या प्रदर्शनाला   चांगला प्रतिसाद  मिळत आहे . हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे  ३ जून २०२३  पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आर्ट फाऊंडेशन च्या  अध्यक्ष सौ. अस्मिता गुरव , उपाध्यक्ष सौ. ज्योती गुरव,खजिनदार विजया राणी लोंढे, सचिव सौ.मृणालिनी शिंदे,जेष्ठ कलाकार कुरेश बसराई, केदारनाथ भागवत, दिलीप पुराणिक यांच्या हस्ते पार पडले. ३० कलाकारांच्या  कलाकृती  या सामूहिक प्रदर्शनात ठेवण्यात आल्या  आहेत.

शिल्पकलेपेक्षा  तुलनेने नवे असलेले सिपोरेक्स ब्लॉक्स चे माध्यम  कलाकार गिरीश मुरूडकर यांनी कल्पकतेने वापरले असून त्यांच्या कलाकृतींचा समावेश 'सावली' या सामूहिक कला प्रदर्शनात करण्यात आला आहे. सिपोरेक्सच्या सिमेन्टब्लॉक्स कोरून पगडया ,छोटा जिरेटोप,वृन्दावन,गणपती,अनेक आर्ट पीस मुरुडकर यांनी केले असून ते या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. हेक्सा ब्लेड ,करवत,पॉलिश पेपर,खिळा ,साल काढण्याची सुरी,कापण्याची सुरी अशा सोप्या घरगुती अवजाराच्या वापरातून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणासंबंधी माहितीही त्यांनी दिली . 

आर्ट फाऊंडेशन आयोजित 'सावली' सामूहिक कला प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद आर्ट फाऊंडेशन आयोजित  'सावली' सामूहिक कला प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on ६/०२/२०२३ १२:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".