पुणे : पुणे शहरातून सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधांमानी बलात्कार केला आहे. खिडकीतून खाली पडलेली वस्तू वर नेऊन देत असताना तिला घरात ओढत तिच्यावर या नराधामांनी अत्याचार केले आहेत. याबाबत कोणाला सांगितल्यास तुझे व तुझ्या घरच्यांचे खूप हाल करू अशी धमकी सुद्धा पिडीतेला देण्यात आली. दरम्यान मुलीने हा प्रकार शिक्षकांना सांगितल्यानंतर समोर आला. या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडला होता.
या सामुहिक बलात्काराप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही घराशेजारील गल्लीख खेळत होती. त्यावेळी तेथील एका घराच्या खिडकीतून वस्तू खाली पडली. तेव्हा पिडित मुलगी ही वस्तू देण्यासाठी घरात गेली. तेव्हा घरात असणाऱ्या तीन नराधांमानी तिला आत ओढून घेतले व घराची आतून कडी लावली. त्यानंतर तिघांनी आळीपाळीने बलात्कार पिडितेवर बलात्कार केला. दरम्यान पिडितेचा रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात साऊंड लावल्या त्यानंतर हे कृत्य नराधांमानी केले.
शाळेतील शिक्षकास तिने सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: