दापोली : एस.एस.सी. परीक्षेत ज्ञानदिप विद्यामंदिर दापोलीचा मनिष महेश कोकरे हा विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवत कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी (बोर्डात) प्रथम आला.
मनिष कोकरे यांने यापूर्वी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात पहिला तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक प्राप्त केला होता. इयत्ता सहावी मध्ये बीडीएस परीक्षेमध्ये संपूर्ण देशांमध्ये शंभर पैकी १०० गुण मिळवून प्रथम आला होता. तसेच विज्ञान प्रदर्शनासह अन्य उपक्रमांतही त्यांने यापूर्वी यश मिळविले आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे ओळखून पालक महेश कोकरे यांनी त्याला अनेक शाळाबाह्य परीक्षेत प्रविष्ठ केले होते आणि मनिषनेही प्रत्येक वेळी यश खेचून आणल्याचे कोकरे यांनी सांगितले. तर आपल्या यशात शाळेतील सर्व शिक्षक आईवडिल यांचा सिंहाचा वाटा असून यापुढे नीट मध्ये यश मिळवून मेडिकल मध्ये करिअर करायचे आहे असे मनिषने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: