मावळवर काँग्रेसचा दावा..!
प्रेरणा
गावंड
रायगड : मावळ लोकसभा मतदारसंघातून २०२४ साठी राजकीय पक्षाच्या
बैठका चालू झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे .
जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत रायगड
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत
देऊ शकतात या वर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ
हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत झाल्याचे कळते.
काँग्रेस पक्ष कोकणात मजबूत करायचा असेल तर स्वतःचे
उमेदवार उभे करणे गरजेचे असल्याने महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी ज्याने पुढील
होणाऱ्या विधानसभेच्या
निवडणूकित महाविकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना ह्या निर्णयामुळे जनमत
जिंकण्यासाठी मोठा फायदा होईल
अन्यथा उरण, पनवेल, कर्जत मधील मतदारांमध्ये
असंतोष पसरेल अशी एकमताने मागणी रायगड मधील काँग्रेस नेते, पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्टींकडे केली असल्याची माहिती कळते .
काँग्रेसची सत्ता केंद्रात यावी म्हणून मोठ्या अपेक्षेने मतदार
महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे
आशेने पाहत असल्याने महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींनी मावळ मतदार संघाची
उमेदवारी महेंद्र घरत यांना दिल्यास नक्कीच सध्यांच्या मतांची बेरीज बघताना
भविष्यातील युतीच्या उमेदवारांना
तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
२००९
पासून राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण
त्यांना अद्याप यश मिळाले नाही .पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार आहे. रायगड
लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला सोडला गेल्यामुळे काँग्रेस पक्ष मावळ लोकसभेवर
दावा करत आहे. कारण मावळ लोकसभा मतदार संघात कर्जत- खालापूर, पनवेल, उरण हे विधानसभा मतदार संघ
येतात आणि यापूर्वी मावळ लोकसभेची उमेदवारी वरच्या उमेदवाराला दिली होती.
मावळ मतदारसंघ हा २००८ मध्ये तयार झाला असून २००९ च्या लोकसभा
निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये श्रीरंग
बारणे हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ हा
शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मावळ लोकसभा मतदारसंघाला रायगडचे उरण, पनवेल, कर्जत खालापूर, तर पुणे मतदारसंघातील मावळ, चिंचवड, पिंपरी असे ६ विधानसभा
मतदारसंघ जोडले आहेत.
या मतदार
संघात शिवसेनेचा
1, भाजप व
सहकारी अपक्ष 3, तर राष्ट्रवादीचा १ आमदार आहे.
काँग्रेस,उद्धव
बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना ,शेकाप
यांची पनवेल, उरण, कर्जत ,खालापूर या विधानसभा
मतदारसंघात निर्णायक मते असल्यामुळे त्याचा फायदा मावळ लोकसभा उमेदवार म्हणून महाविकास
आघाडी यांना मिळू शकतो.
मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे संभाव्य
उमेदवार असतीलच अशी शक्यता आहे. त्यांचा सामना करण्यासाठी लोकप्रिय, दानशूर अभ्यासू व जनमत
खेचणारे लोकनेतृत्व म्हणून काँग्रेस्मधून एकमताने महेंद्र घरत यांच्या नावाची
चर्चा जोर धरून आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या
युतीच्या निर्णयात मावळ मतदार संघ कोणाकडे ही जागा सोपवतो ह्याकडे अनेक राजकीय
विश्लेषक नजर ठेवून आहेत. महेंद्र घरत यांना मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्याने सेना
भाजप युती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: