दहावी,बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे : ब्राह्मण महासंघाच्या 'देसी ' या शैक्षणिक संस्थेच्या वतीने दहावी,बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करियर विषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
प्रा. हरिश्चन्द्र कुलकर्णी ,श्री शशिकांत घनशेट्टी,डॉ. सुरज जोशी,सी. ए .आदिती जोशी,अर्चना मराठे,आरती कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी 'देसी ' संस्थेच्या विश्वस्त सौ आसावरी दिवाण, सौ. तृप्ती तारे, सौ. लता दवे, सौ. अस्मिता वैद्य, सौ. मेघा म्हसवडे आणि सौ. श्वेता कुलकर्णी उपस्थित होत्या. 'नवीन शैक्षणिक धोरण हे खूप किचकट असले तरी भविष्यात विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे,' असे प्रा. हरिश्चन्द्र कुलकर्णी यांनी सांगितले. हा कार्यक्रम पेरूगेट भावे हायस्कुल येथे झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: