मराठवाडा : वनपरिमंडळ बनोटी क्षेत्रात वृक्षांची कत्तल करून अवैधरित्या तस्करी, वनपरिमंडळ अधिकारी सुस्त...
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव वनपरिक्षेत्राच्या वनपरिमंडळ बनोटी क्षेत्रात लाकूड तस्करांकडून अवैधरित्या वृक्षांची कत्तल केली जात आहे याकडे वनपरिमंडळ अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने लाकूड तस्करांकडून मोठ्या प्रमाणात डेरेदार वृक्षांची कत्तल करून पाचोरा,नगरदेवळा जि जळगाव येथील सॉ मिल व वीट भट्टीधारकांना ट्रॅक्टरद्वारे भरदिवसा लाकडे ताडपट्टीने झाकून व मध्यरात्री बेरात्री पुरवली जात आहेत.
ट्रॅक्टर व ट्रॉलीवर प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेला नोंदणी क्रमांक सुध्दा लिहिलेला नसतो विना नंबर हे ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृक्षारोपण व संवर्धनासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केला जातो. त्याचे रक्षण करणारेच भक्षक झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड झाली पाहिजे व तिचे संवर्धन फायद्याचे ठरणारे आहे .दरम्यान वनपरिमंडळ बनोटीचे अधिकारी, वनरक्षक यांचे लाकूड तस्करांशी असलेल्या संबंधामुळे कारवाई होत नसल्याचे वृक्षप्रेमींमधून बोलले जात आहे.
वृक्षतोडी संदर्भात वरिष्ठांना माहिती दिली असता तात्काळ कारवाईचे आदेश दिले जातात मात्र कर्मचारी घटनास्थळी पोहचतच नाही. सर्व सुरळीत झाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचतात त्याठिकाणी त्यांना काही दिसत नाही किंवा न दिसण्याचे सोंग आर्थिक कृतीतून करीत असल्याची भावना वृक्षप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.जिल्हा रेंज वनविभाग अधिकारी यांनी बनोटी वनपरिमंडळात होत असलेल्या अवैधरित्या वृक्षांची कत्तल व वाहतुकीवर उपाययोजना करून स्थानिक वनविभागाच्या कर्मचारी व लाकूड तस्करांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: