पुणे : पुण्यानजिक लोणी काळभोर येथील रामदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्यावेळी उभारण्यात आलेले स्टेज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता आयोजित बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
बाळासाहेब कोळी (वय ४६, निनाम पाडळी, जि. सातारा) असे मृताचे नाव असल्याचे समजते. तर शुभम लोखंडे, मयूर लोखंडे आणि विकास ढमाले हे जखमी झाले असून त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की शर्यतीदरम्यान मुसळधार पावसामुळे लोकांनी पावसाच्या पाण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्टेजखाली आश्रय घेतला. दुर्दैवाने, स्टेजच्या खाली चार लोक आश्रय घेत असताना, ते अचानक कोसळले, एकाचा मृत्यू झाला आणि इतरांना दुखापत झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: