'भाजप हटाव देश बचाव' ला कर्नाटक मधून प्रारंभ : अजित गव्हाणे

 


पिंपरी :  महागाई, भ्रष्टाचार आणि जातीय राजकारणाला कंटाळलेल्या कर्नाटकमधील जनतेने भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर दिले आहे. 'भाजप हटाव देश बचाव'ला कर्नाटक मधून प्रारंभ झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, देशातील लोकांचा मूड बदलत आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे देशात मोदी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे. याचा प्रत्यय कर्नाटक विधानसभा निकालातून आला आहे.  तसेच आगामी लोकसभा आणि राज्यातील

2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताही भाजप आणि शिंदेसेनेला धडा शिकविणार आहे,  असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

'भाजप हटाव देश बचाव' ला कर्नाटक मधून प्रारंभ : अजित गव्हाणे 'भाजप हटाव देश बचाव' ला कर्नाटक मधून प्रारंभ : अजित गव्हाणे Reviewed by ANN news network on ५/१३/२०२३ ०७:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".