बंदिशीतून उलगडली राधाकृष्णाची प्रेम कहाणी !

 


' मधुर सुरांतून चित्र बोलते ' कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद 

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन  

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत    चित्रकला व शास्त्रीय संगीत या दोन अभिजात कलांची एकत्र गुंफण असलेल्या 'मधुर सुरांतून चित्र बोलते ' या  भाग्यश्री गोडबोले यांच्या  कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.  त्यांनी चितारलेल्या राधाकृष्ण लघुचित्रांचे प्रदर्शन आणि त्या चित्रांवरील त्यांच्या स्वरचित शास्त्रीय संगीतातील बंदिशींचे सादरीकरण असा एकत्रित कलासंगम रसिकांना अनुभवता  आला.  आविष्कार क्रिएशन्स्, पुणे  यांनी या  कार्यक्रमाची निर्मिती केली होती .  

कार्यक्रमामध्ये चित्रकार- गायिका भाग्यश्री गोडबोले; तसेच  मीनल जोशी - परांजपे आणि मेघना सहस्रबुद्धे-खंडकर सहभागी झाले . अथर्व कुलकर्णी (संवादिनी) आणि रोहन चिंचोरे (तबला) यांनी साथसंगत केली.सुप्रिया निजामपूरकर यांनी निवेदन केले.

१३ मे २०२३ रोजी शनिवार  सायंकाळी ५.३० वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १६५ वा कार्यक्रम  होता.

राधा-कृष्णाच्या प्रेमाची कहाणी चित्र आणि सूरांतून रसिकांपुढे आले. रागांची गुंफण चित्रांशी केली आणि रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

श्याम कहेत मन की बात (पुरिया धनश्री ),मोरे पिहरवा रे(गावती), मानत नाही श्याम बतिया इक मोरी(मुलतानी ),  पिया बिन कछु नाही भाए(चारूकेशी),रैन गयी रुसवेकी(बागेश्री)   आयी बरखा ऋत( रामदासी मल्हार ),  कन्हाई करत धिटाई (जोग कौंस ),  झुला झुले , मनवा डोले( मिश्र देस) अशा अनेक बंदिशीच्या बहारदार सादरीकरणांना रसिकांनी भरभरून  दाद दिली.

बंदिशीतून उलगडली राधाकृष्णाची प्रेम कहाणी ! बंदिशीतून उलगडली राधाकृष्णाची  प्रेम कहाणी ! Reviewed by ANN news network on ५/१३/२०२३ ०७:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".