दिलीप प्रेमनारायण तिवारी, वय ४२ वर्षे, रा. मराठा चौक, रोशन मस्जित मागे, गल्ली नं. ७, अब्दुल मल्लिक यांची रूम, इचलकरंजी, ता. हतकणंगले, जि. कोल्हापुर मूळ रा. ग्राम पोस्ट बिजुरी, तहसिल बेंदकी, जि. फतेहपुर राज्य उत्तर प्रदेश २१२६५७ , चंदनकुमार उर्फ बैजुराय चंदेशवर राय, वय १९ वर्षे, रा. खोतवाडी, पार्वती इंडस्ट्रीज समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर मूळ रा. जहांगिरपुरसाम, पो. देसरी, मंडल महानार, जि. वैशाली राज्य बिहार ८४४५०४ , सुगनकुमार जवाहिर राय, वय १८ वर्षे, रा. खोतवाडी, पार्वती इंडस्ट्रीज समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर मूळ रा. बिशणुपूर सैदअली, मंडल विदुपूर जि. वैशाली, राज्य बिहार अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक कट्टा आणि दोन काततुसे असा ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिलीप तिवारी याने वसई येथे त्याने ४ जणांची हत्या तसेच २ जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याने त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो कोवीड काळात पॅरोलवर बाहेर आला परंतु जेलमध्ये परत गेलाच नाही. सध्या तो अवैध शस्त्र वक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक, कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. फौजदार राकेश बोयणे, अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांनी केली.
पिंपरी : पॅरोलवरील गुन्हेगारासह अन्य दोघांना पिस्तुल विक्री करताना अटक
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२३ १०:३९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: