पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे राहणा-या आणि पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरीपदावर कार्यरत असल्याचे भासविणा-या एका तोतयाला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव असून तो डॉ. विनय देव या नावाने वावरत होता.
औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून तो हजर होता. पोलिसांना त्याचा संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
29 मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डरलेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मूकाश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आरोपी हजर होता. त्याने आपण स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगिितलेल्या माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिका-यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण तोतयेगिरी करत असल्याची कबुली दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: