किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान

 


पुणे : 'सम्यक पुरस्कार समिती ' तर्फे देण्यात येणारा ' सम्यक पुरस्कार ' पुरस्कार  चित्रपट अभिनेते किरण माने यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात   आला .  त्यांच्यासोबत गुलाब गजरमल ,रामहरी ओव्हाळ, रमेश राक्षे , उत्तम वनशिव,  शरद जाधव आणि प्रा. के.  व्ही. सोनकांबळे या मान्यवरांना सम्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी १० मे हा "स्वाभिमान दिन" म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दरवर्षी संम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समता स्वातंत्र्य बंधुत्वतः ही मूल्य जपणाऱ्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे या पुरस्काराचे हे १५ वे वर्ष होते .

     पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दि. १० मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच , पुणे येथे झाला.    कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत  वसंत साळवे होते  तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष  मुनव्वर कुरेशी हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होतेएड.किरण कदम यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वप्निल पवार, संतोष संखद आणि मेघानंद जाधव यांचा "संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार" हा आंबेडकरी जलसा सादर केला .मुख्य आयोजक नागेश भोसले आणि प्रा विलास घोगरे यांनी आभार मानले.
किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान किरण माने यांना  सम्यक पुरस्कार प्रदान Reviewed by ANN news network on ५/११/२०२३ ०४:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".