चिपळूण : माहिती अधिकार महासंघ,महा.राज्य वतीने आज चिपळूण तालुकाकार्यकारिणी निवडीसाठी चिपळूण येथे कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेसाठी रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता उपाध्यक्ष राजू बोथरे उपस्थित होते. यावेळी सभेला सर्वानुमते चिपळूण तालुकाध्यक्षपदी - सौ.स्वाती हडकर ,उपाध्यक्षपदी योगेश पेढांबकर ,कार्याध्यक्षपदी बाळू कोकाटेयांची सर्वानुमते निवड करण्यात आली,उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले.
सभेला चिपळूण तालुका महिलाध्यक्षा स्वाती हडकर, चिपळूण तालुका उपाध्यक्षपदी योगेश पेढांबकर, तालुका कार्याध्यक्षपदी बाळू कोकाटे, चिपळूण तालुका सहसचिव महिला तालुका शहरध्यक्षा विद्या भेकरे, चिपळूण तालुका महिला मुख्य प्रचारप्रमुख मानसी मुदलियार, महिला तालुका निमंत्रक दिपाली पाटील,चिपळूण शहराध्यक्ष सुरेश फके, गुरव,तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन संघटनेचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष योगेश पेढांबकर यांनी केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०४:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: