पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर आज तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात गम्भीर जखमी झालेल्या आवारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांची भेट घेण्यासाठी १२ एप्रिल रोजी दुपारी नगरपरिषद कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर ते खाली आले असता तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला हल्ला केला. दोघांनी आवारे यांच्यावर कोयत्याने वार केले तर दोघांनी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना हल्लेखोर काही काळ तेथेच थांबले होते असे समजते.
जखमी आवारे यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. या प्रकारानंतर परिसरातील तणावाचे वातावरण पाहता बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आवारे यांनी अनेक स्थानिक प्रश्नांना वाचा फ़ोडत प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले होते. सोमटणे येथील टोलनाका हटविण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन, कोविड काळात गरजूंना केलेली मदत, अपंग व्यक्तींना अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे तळेगावकरांच्या स्मरणात आहेत.
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२३ ०३:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: