कावळ्याने जखमी केलेल्या कोकीळ पक्षाचे स्वर निसर्गात पुन्हा गुंजले



 सिल्लोडचे डॉ .संतोष पाटील यांनी उपचार करून राबविले "मिशन लता"


 दिलीप शिंदे

सोयगाव :  सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एक कोकीळ पक्षी खाली पडली ,एक कावळा त्याच्यावर हल्ला करत होता व हल्ल्याने घायाळ होऊन तो निपचीत पडला होता. ही घटना सामाजिक कार्यकर्ते  दादाराव आळणे यांनी दूरध्वनीद्वारे  सिल्लोड येथील जैवविविधता व पर्यावरण संवर्धक डॉ.संतोष पाटील यांना कळवली.क्षणाचाही विलंब न लावता विशिष्ट पद्धतीने बनविलेक्या व्हेंटिलेटेड बॉक्स मध्ये सदर मादी जातीच्या पक्षाला  आणण्यात आले .डॉ.संतोष पाटील यांनी व्यवस्थित निरीक्षण केल्यावर  लक्षात आले की कावळ्याने चोची मारून कोकिळच्या उजव्या डोळ्याजवळ जखम केली तेथून   रक्तस्राव होत होता व पायाला पण जखम झाली होती.कोकीळ शांत रहात नव्हती ,उपचार करणे अवघड होत असल्याने  मोबाईल वर नर कोकीळ ची कु हू कु हू ही धुन लावण्यात आली व त्या आवाजाने मादी कोकिळा जरा स्थिरावली व डोळ्यात रुतलेले पंख काढून  जखम नॉर्मल सलाईन इरिगेट करून स्वछ करून अँटी बायोटिकस ड्रॉप व रक्तस्राव थांबविण्यात आला.पायाच्या जखमेवर ही उपचार केले गेले.मध व तांदुळातील अळ्या कोकिळेस भरविण्यात आल्या.दिवसभर निगराणीत ठेवले त्यानंतर संध्याकाळी रजाळवाडी  जवळ कोकिळेस आधी जमिनीवर सोडण्यात आले व ती जमिनीवरून उडत जवळच्या झाडावर बसली.तीने थोड्या वेळाने किंक किंक अशी साद ही घातली. लगेच च कोकिळेने भुर्रर्रर्र अशी भरारी घेतली.डॉ.पाटील यांनी 10 वर्षांत शेकडो पक्षी व इतर वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत.



कोकीळ आणि कावळा भांडण जुनेच 

कोकीळ हा इतर पक्षांची विशेषतः कावळ्याची अंडी खातो व बऱ्याचदा ही अंडी खाऊन कावळ्याच्या घरट्यातच कोकिळ अंडी घालते व या दोन पक्षात वाद नेहमीचाच असतो.या घटनेस ही पार्श्वभूमी असावी अशी माहिती डॉ पाटील यांनी दिली.या कामी वैभव निकोद,शुभम आरके,गणेश पारवे यांनाही सहकार्य केले. 

 

जखमी  पक्षांना  वाचविण्यासाठी  'मिशन भरारी" हे मोहीम वजा उद्दिष्टे ठेवून कार्य करत असतांना झोकून देण्याची मानसिकता बनते.निसर्गात कोकीळ हा सुंदर गायक पक्षी समजला जातो तो त्याच्या गोड गळ्यामूळे.म्हणूनच गान सम्राज्ञी स्व.लता दिदी यांना भारताची कोकिळा म्हटले जाते.त्यांच्या पावन स्मृतीस हे कोकिळा वाचविण्याचे मिशन स्वर भरारी अर्पण करतो.

      -डॉ.संतोष पाटील,जैवविविधता संवर्धक,संशोधक,अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड 

कावळ्याने जखमी केलेल्या कोकीळ पक्षाचे स्वर निसर्गात पुन्हा गुंजले कावळ्याने जखमी केलेल्या कोकीळ पक्षाचे स्वर निसर्गात पुन्हा गुंजले Reviewed by ANN news network on ५/१२/२०२३ ०१:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".