जळगाव : विराज कावडीया यांची मध्यरेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी निवड

 

जळगाव : युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज अशोक कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली तर्फे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता (प्रवाशी) सल्लागार समितीच्या सदस्य पदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. मागील कार्यकाळाच्या (फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2023)  समितीतदेखील विराज कावडीया यांनी सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल त्यांना पुन्हा या समितीत समाविष्ट करून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. कावडीया हे या समितीतील सर्वात युवा सदस्य आहेत.

निवड पत्रक रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच त्यांना प्राप्त झाले असून सदर निवड 2 वर्षासाठी असून 31 जानेवारी 2025 पर्यंत समितीचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तिन राज्यातील मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर मंडळाचा समावेश असून सुमारे 476 रेल्वे स्थानक या क्षेत्रात येतात. 

रेल्वे प्रवाश्यांच्या हीताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे, तसेच रेल्वे बोर्ड आणि प्रवाश्यांमधील दूवा बनून समन्वय साधणे हे मुख्य ध्येय राहणार असल्याची भावना विराज कावडीया यांनी व्यक्त केली.

यासाठी त्यांना खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, युवासेना राष्ट्रीय सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


जळगाव : विराज कावडीया यांची मध्यरेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी निवड जळगाव : विराज कावडीया यांची मध्यरेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी निवड Reviewed by ANN news network on ५/०६/२०२३ ०६:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".