कोकण : वेळणेश्वर येथील एकास जन्मठेपेची शिक्षा

 


खेड : एका व्यक्तीचा खून आणि त्याच्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणा-या वेळणेश्वर येथील एकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.नंदकुमार बाबाजी तांडेल  असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

त्याने २८ जुलै २०१८ रोजी दिवाकर तांडेल याच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याचा खून केला होता. आणि दिवाकर याची पत्नी देवयानी हिलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याच्यावर खटला दाखल केला होता. या खटल्यात आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एस मोमीन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

खुनाची घटना घडण्यापूर्वी आरोपीची पत्नी अंजनी आणि मृत दिवाकर याची पत्नी देवयानी यांच्यात श्याब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यावसान भांडणात झाले. मात्र, समाजाची बैठक होऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतरही संतापाने धुमसत असलेल्या नंदकुमार याने २८ जुलै २०१८ रोजी दिवाकर याच्या घरात घुसून तो जेवत असताना त्याच्या डोक्यात काठीचे प्रहार करून त्याला ठार मारले. तर, देवयानी हिलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

हा प्रकरणी देवयानी हिने केलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुहागरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सरकारी वकील प्रफुल्ल साळवी  आरोपी नंदकुमार तांडेल याला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन यांनी नंदकुमार तांडेल याला जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली/


कोकण : वेळणेश्वर येथील एकास जन्मठेपेची शिक्षा कोकण : वेळणेश्वर येथील एकास जन्मठेपेची शिक्षा Reviewed by ANN news network on ५/०८/२०२३ ०३:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".