पिंपरी : डिलेव्हरी बॉयचे काम करताकरता सायकलचोरीचा जोडधंदा करणा-या एका चोरास वाकड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८५ हजार रुपये किमतीच्या ६ महागड्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
राहुल रविंद्र पवार वय २५ वर्षे रा. श्रीकृष्ण कॉलनी नं. ०१, श्रीकृष्ण जिमच्या बाजुला, काळेवाडी पुणे असे अटक करण्यात आलेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे.
रहाटणी येथील संदीप दिगंबर तांबे वय ४३ वर्षे यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेली सायकल एका अनोळखी इसमाने त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्कींग मधुन चोरुन नेली आहे अशी तक्रार वाकड पोलीसठाण्यात केली होती. या अनुषंगाने पोलीस तपास करत असताना चोर डिलेव्हरी बॉय असून तो सायकली चोरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीसपथक रहाटणी परिसरात गस्त घालत असताना हा चोर चोरलेली सायकल विकण्यासाठी तापकीरमळा चौकाजवळ येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चोर तेथे आल्यावर त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसीखाक्या दाखवल्यानंतर त्याने आपण सायकली चोरून त्या ओएलएक्सवर जाहिरात देऊन विकत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६ सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक गुन्हे-२ रामचंद्र घाडगे , सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फ़ौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, हवालदार वंदु गिरे, संतोष बर्गे, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, नाईकअतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, कौतेंय खराडे, भास्कर भारती, तसेच परिमंडळ-०२ कडील शिपाई पंडीत यांनी केली.
पिंपरी : महागड्या सायकली चोरणारा डिलेव्हरी बॉय अटकेत; ६ सायकली जप्त!
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२३ ११:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: