कोकण : तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने दापोलीत सायकल फेरी

 


दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ७ मे २०२३ रोजी नतंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने  सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल फेरी दरम्यान डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट देऊन तिथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्यात येईल.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:१५ वाजता सुरु होईल. ती उदयनगर, लष्करवाडी, आनंदनगर, पांगारवाडी, नर्सरी रोड मार्गे फळे आणि भाजीपाला प्रक्रिया केंद्र, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे जाईल. तेथे वेगवेगळ्या फळांवर प्रकिया करुन बनवले जाणारे पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याबद्दल माहिती करुन घेतली जाईल. तसेच विद्यापीठात संशोधन करुन तयार केलेल्या १०० हुन अधिक आंब्याच्या व इतर फळांच्या विविध प्रजांतींबद्दल माहिती घेण्यात येईल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण : तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने दापोलीत सायकल फेरी कोकण : तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने दापोलीत सायकल फेरी Reviewed by ANN news network on ५/०६/२०२३ ०२:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".