किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत!

 


तळेगाव दाभाडे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी सिनू उर्फ श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) याला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे.

यापूर्वी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर यांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली असून संदीप मोरे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी किशोर आवारे यांच्या मातु:श्रींनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी सिनू हा देहूरोड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चार आरोपींना शनिवारी दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत! Reviewed by ANN news network on ५/१३/२०२३ ११:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".