शिर्डी : श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या सहका-यांनी श्रीक्षेत्र शिर्डीमध्ये शुक्रवारी रात्री ६ हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यसायावर छापे घातले. या प्रकरणी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून १५ महिला तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळल्या.
शिर्डीतील अनेक हॉटेल्समध्ये वेश्याव्यसाय चालविला जात असल्याची माहिती मिटके यांना मिळाली होती. त्यावरून पोलीसपथकाने हाॅटेल एक्जिक्युटिव्ह इन, हाॅटेल साई कीर्ती पॅलेस, हाॅटेल एसपी, हाॅटेल साईशीतल, हाॅटेल गणेश पॅलेस, हाॅटेल साई महाराजा या हाॅटेलवर छापे टाकले. यामध्ये अनेक तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेल्सचा समावेश असल्याचे समजते. हॉटेल्सवर कारवाई होत असल्याचे वृत्त समजताच अनेकांनी आपली हॉटेल्स बंद केली.
उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह निरीक्षक विलास पुजारी, शिवाजी डाेईफाेडे, मेघशाम डांगे, सहायक निरीक्षक माणिक चाैधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२३ ०८:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: