तळेगाव दाभाडे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील सहावा आरोपी गौरव खळदे (रा. तळेगाव दाभाडे) याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
आजवर पोलिसांनी या प्रकरणी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर, संदीप मोरे सिनू उर्फ श्रीनिवास शिडगळ आणि आता गौरव खळदे अशा सहा आरोपींना अटक केली आहे.
आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काल जनसेवा विकास समितीने तळेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आणि या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अशी मागणी केली. आज १४ मे रोजी सुनिल शेळके यांच्या समर्थनासाठी शेळके समर्थक मोर्चा काढणार आहेत.
या सर्व घडामोडींमुळे हत्या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून मावळातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२३ १२:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: