मान्सून अपडेट...... नैऋत्य मान्सूनची प्रगती
पुणे : हवामानखात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून आज, 30 मे 2023 रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे.
मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्य उपसागराच्या काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 2-3 दिवसात पाऊस बंगालमध्ये दाखल होईल.
यंदा मान्सूनचे आगमन ८ दिवस लांबले आहे. मात्र, सध्याचे हवामान पाहता तो हा विलंब भरून काढेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: