कोकण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (VIDEO)

 


अलिबाग :  चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.19 मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली असता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  चवदार तळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ते बुद्धवंदनेत सहभागी झाले होते.    

        यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, बार्टी चे महासंचालक श्री.धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी श्री.महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.  

       यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कोकण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (VIDEO) कोकण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (VIDEO) Reviewed by ANN news network on ३/२०/२०२३ ०२:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".