चिपळूण : चिपळूण नजिकच्या कामथे येथे मुंबई गोवा महामार्गावर आज बोलेरो आणि स्कूलबस यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. काही ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले अहे. मात्र, फ़लक लावलेले नाहीत. त्यामुळे चालकांचा वाहन चालविताना गोंधळ उडत असून त्यातून असे अपघात घडत आहेत.
या अपघातामधील बोलेरो विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची असून चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडच्या दिशेने निघाला होता. कामथे येथे येताच एक स्कूलबस अचानक विरुद्ध दिशेने आली. दोन्ही वाहन चालकांचा यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात बोलेरो जागीच उलटली. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. यावेळी स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना काही इजा झाली नाही. बोलेरोमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२३ ०२:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: