चाकण : चाकण येथील एका कंपनीच्या मागील खिडकीचे गज कापून आतील ३५० किलो तांबे चोरून नेणारया दोघा चोरट्यांना चाकण पोलीसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांच्याकडून चोरलेले तांबे आणि गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा असा एकूण ४ लाख २१ हजार ८४० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
अशोक विलास खिल्लारे. वय २७ वर्षे रा. शांतीनगर भोसरी पुणे मूळ रा. लिंबागणेश पोखरी, ता जि बीड आणि कबीर लालसींग गौर उर्फ राहुल, वय २६ वर्षे रा. आळंदी फाटा गवते वस्ती चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. आईनाचौडा, कासार, थाना उधारबंद, जि. सिलचर, राज्य आसाम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
१० मार्च रोजी चाकण येथील सासवड हिट ट्रन्सफर कंपनीच्या मागील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ३५० किलो तांब्याचे रोल लांबवले होते. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक पवनकुमार सिंह यांनी चाकण पोलीसठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तेथे भादवि कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा क्रमांक २९२ / २०२३ दाखल होता. पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. यासाठी ५० पेक्षा जास्त ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरयांचे फ़ूटेज तपासण्य्तात आली. त्यावरून चोरट्यांनी रिक्षातून येऊन ही चोरी केल्याचे दिसून आले. अधिक तपास सुरू असताना
असताना हवालदार संदीप सोनवणे यांना या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याच सुगावा लागला. त्यानंतर तात्काळ तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जराड, फ़ौजदार हिंगे, हवालदार संदीप सोनवणे, नाईक कांबळे, शिपाई भागवत याणी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सहायक फ़ौजदार सुरेश हिंगे, हवालदार राजू जाधव, संदिप सोनवणे, नाईक हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, कॉन्टेबल नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२३ ०६:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: