पिंपरी : देशातील 'टॉप टेन' खासदारांमध्ये श्रीरंग बारणे

 



 

 लोकसभेत ५०८ प्रश्न विचारुन पटकाविले दुसरे स्थान

 

पिंपरी : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे

'गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिकसंस्थेमार्फत  सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणा-या 'टॉप-टेन'मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. १४८ वेळा चर्चेत सहभाग आणि ५०८ प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.

 

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुस-या स्थानावर आहेत. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीनशिवसेनेचे तीनराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे.

 

खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत ५०८ प्रश्न विचारले आहेत. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती ९४ टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोहाळाव्या  लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. खासदार श्रीरंग बारणे हे सातत्याने मावळातील प्रश्न लोकसभेत मांडतात. त्याबाबत आवाज उठवितात. या कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सातवेळा संसदरत्नमहासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

लोकांमध्ये राहणारालोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणाराजमिनीवर राहून काम करणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. मागील नऊ वर्षांपासून मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. खासदार बारणे पहिल्या दहामध्ये आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहेत. तरशिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.



मावळच्या जनतेने माझ्यावर सलगदोनवेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे कामकाज करत आहे. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. सतराव्या लोकसभेत आत्तापर्यंत ५०८ प्रश्न विचारले आहेत. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती ९४ टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. संसदेतील या कामगिरीमुळे देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये माझा समावेश आहे. यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील.

खासदार श्रीरंग बारणे 

पिंपरी : देशातील 'टॉप टेन' खासदारांमध्ये श्रीरंग बारणे पिंपरी : देशातील 'टॉप टेन' खासदारांमध्ये श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on ३/२३/२०२३ ०५:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".