चाकण : टेम्पो चोरून नेणारा गजाआड!

चाकण : चाकण एमआयडीसी परीसरातील एका वाहतूक कंपनीचा टेम्पो तेथे काम करणारया कामगाराने चोरून नेला होता. या प्रकरणी चाकण पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या शिताफ़ीने तपास करून चाकण पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला सातपूर, नाशिक येथून अटक करून त्याच्याकडील टेम्पो हस्तगत केला आहे.

अनिल उर्फ कुरकुर श्रीनिवास यादव वय ३५ वर्षे रा. पिंपरी, पो. रामनगर, ता. भनपूर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश सध्या राहणार चिंचपाडा, घणसोली. यादवनगर झोपडपटटी, जि. ठाणे याला अटक करण्यात आली आहे.

चाकण एमआयडीसी परीसरातील सकून ऑटो प्रा. लि. या कंपनीत आरोपी काम करत होता. २१ मार्च रोजी त्याने कंपनीच्या मालकीचा टेम्पो क्रमांक एमएच १४ केए ९६७९ चोरून नेला अशी तक्रार संतोष सिंग रा. मोशी, पुणे यांनी २२ मार्च रोजी चाकन पोलीसठाण्यात नोंदविली होती, त्यावरून भादंवि कलम ३८१ अन्वये ३१४ / २०२३ क्रमांकाने गुन्हा दखल करण्यात आला होता.

याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करत होते. पथकातील सहायक पोलीस फ़ौजदार सुरेश हिंगे आणि नाईक भैरोबा यादव यांनी टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फ़ूटेजची तपासणी केली असता आरोपी टेम्पो घेऊन नाशिकच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसपथ तात्काळ नाशिक येथे पोहोचले. व तेथे पाठलाग करून त्यांनी आरोपीला टेम्पोसह ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, फ़ौजदार सुरेश हिंगे, हवालदार राजू जाधव, संदिप सोनवणे, नाईक हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, कोन्स्टेबल नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केली.



चाकण : टेम्पो चोरून नेणारा गजाआड! चाकण : टेम्पो चोरून नेणारा गजाआड! Reviewed by ANN news network on ३/२३/२०२३ ०६:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".