जळगाव : जळगाव शहरातील तांबापूर भागात पंचशिलनगरामध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, मात्र सस्त्यामधून वाहणारी हटारे आणि नाले यांच्यावर सिमेंटचे ढापे टाकण्यात आलेले नाहीत त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यातील गटारे ओलांडणे जिकीरीचे झाले आहे.
महापालिकेने या गटारांवर तात्काळ ढापे टाकावेत अशी मागणी तांबापूर भागातील रहिवासी संपत सोनवणे, विकार खान, जमील खाटीक यांनी केली असून येत्या दोन ते तीन दिवसात हे काम सुरू झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या जळगावात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इच्छादेवी ते डीमार्ट पर्यंतचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. तांबापूर भागात काही रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पंचशीलनगरात फुकटपुरा येथे बारा दिवसांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. रस्त्यातून आडव्या वाहणारया गटारांवर सिमेंटचे ढापे टकून देण्याचे आश्वासन नगरसेवक आणि मक्तेदाराने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ते काम केले नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे काम त्वरित करावे अशी नागरिकांची मागणी आहे.
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२३ ०५:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: