कोकण : पत्रकार दिलीप जाधव यांचे निधन

खेड:  येथील जेष्ठ पत्रकार दिलीप धोंडू जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने आज मंगळवारी  मोरवंडे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.

त्यांनी मुंबईतून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या गावी परतल्यावर, रत्नागिरी टाइम्स, पुढारी, सामना, या वर्तमानपत्रात त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केले तर पराशक्ती, कोकण संग्राम या वर्तमानपत्रांचे कार्यकारी संपादक, संपादक म्हणून काम केले. सध्या ते माझे कोकण या स्थानिक वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक तसेच सामनाचे प्रतिनिधी  म्हणून काम करत होते , 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

कोकण : पत्रकार दिलीप जाधव यांचे निधन कोकण : पत्रकार दिलीप जाधव यांचे निधन Reviewed by ANN on ३/२२/२०२३ १२:५२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".