मुंबई : इंडिजेन या जागतिक लाइफ सायन्सेस उद्योगावर लक्ष्याधारित असलेल्या डिजिटल प्रथम वाणिज्यिकीकरण कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस् (“डीआरएचपी”) बाजारातील नियाम सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.
कंपनीच्या प्रारंभीच्या पब्लिक ऑफरिंगमध्ये ९५०० दशलक्ष रूपयांपर्यंत नवीन इश्यू आणि समभागधारकांना सुमारे ३६.३ दशलक्ष समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये वैयक्तिक विकणाऱ्या समभागधारकांकडून (मनिष गुप्ता, डॉ. भास्करन नायर आणि अनिता नायर) सुमारे २.७ दशलक्ष समभागांचा आणि कार्लाइल, ब्रायटन पार्क कॅपिटल आणि नादाथूर फॅमिली ऑफिससारख्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून ३३.६ दशलक्ष समभागांचा समावेश आहे. इंडिजेनने फेब्रुवारी २०२१ मध्ये कार्लाइल ग्रुप आणि ब्राइटन पार्ककडून २०० दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे.
आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधींचा वापर कर्जाची परतफेड/ पूर्वप्रदान, भांडवली खर्च, त्यांच्या एका मागील ताब्यासाठी प्रलंबित असलेल्या रकमेचे प्रदान, वाढीसाठी वित्तपुरवठा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.
लाइफ सायन्सेस कंपन्या विशेषीकृत बुद्धिमत्तेची आणि इनहाऊस डिजिटल क्षमतांची कमतरता, वाढते विक्री आणि मार्केटिंग (एसअँडएम) आणि संशोधन आणि विकास (आरअँडडी) खर्च, नियामक वैद्यकीय कामकाज प्रक्रियांचे सुलभीकरण आणि शल्यचिकित्सकीय चाचण्यांमधील वाढती गुंतागूंत या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिकीकरण कार्य आऊटसोर्स करत आहेत. हा उद्योग डिजिटल वापरात इतर उद्योगांपेक्षा तुलनेने मागे आहे. त्यामुळे इंडिजेनसारख्या डिजिटल फर्स्ट कंपन्यांना वाढीसाठी महत्त्वाची संधी मिळते आहे.
इंडिजेनची स्थापना १९९८ साली पहिल्या पिढीतील पाच उद्योजकांकडून केली गेली होती- मनिष गुप्ता (आयआयटी- बीएचयू, आयआयएम अहमदाबाद), डॉ. संजय पारीख (आयआयटी मुंबई, जॉन हॉपकिन्स), डॉ. राजेश नायर (आयआयएम अहमदाबाद), गौरव कपूर (ईएनपीसी पॅरिस) आणि आनंद किरण (बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड बीके स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अहमदाबाद). ही कंपनी जैवऔषधशास्त्रीय, उगवत्या बायोटेक आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांना उत्पादने विकसित करण्यासाठी, बाजारात आणण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात विक्रीला चालना देण्यासाठी उपाययोजना देते. कंपनीच्या सोल्यूशन्सच्या व्यापक पोर्टफोलिओ, आरोग्यसेवा क्षेत्रातील ज्ञान आणि नवीन युगाच्या उगवत्या तंत्रज्ञानांच्या वापरामुळे लाइफ सायन्सेस वाणिज्यिकीकरण प्रक्रियेत समाविष्ट महत्त्वाच्या घटकांचे कार्यक्षमतेने आधुनिकीकरण करण्यासाठी मदत झाली आहे.
इंडिजेनचा विविध कंपन्या ताब्यात घेऊन मूल्यनिर्मिती करण्याचा विक्रम आहे. कंपनीने आपल्या स्थापनेपासून ११ कंपन्या ताब्यात घेऊन आपल्या समूहात समाविष्ट केल्या आहेत. कल्टहेल्थ ही अमेरिकास्थित पूर्ण सेवा आरोग्यसेवा मार्केटिंग एजन्सी ऑक्टोबर २०२२ मध्ये, मेडिकल मार्केटिंग इकॉनॉमिक्स ही अमेरिकास्थित, मूल्याधारित प्राइसिंग, मार्केट एक्सेस आणि परतावा धोरण कंपनी २०२१ मध्ये आणि डीटी असोसिएट्स ही ब्रिटनस्थित, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ग्राहकानुभव सल्ला संस्था २०१९ मध्ये त्यांनी ताब्यात घेतली.
३० जून २०२२ नुसार इंडिजेनकडे ५२ कार्यरत ग्राहक आहेत. इंडिजेनच्या ग्राहकांमध्ये २० पैकी सर्वांत मोठ्या जागतिक जैवऔषधनिर्माणशास्त्रीय कंपन्यांपैकी १९ कंपन्या आहेत. इंडिजेनचा ६६ टक्के महसूल उत्तर अमेरिकेतून येतो, २७ टक्के युरोपमधून तर ७ टक्के महसूल उर्वरित जगातून येतो. ही कंपनी उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये स्थित सहा कार्यान्वयन केंद्रांमधून आणि १६ कार्यालयांमधून डिलिव्हरी सर्वोत्तमता साध्य करते.
इंडिजेनने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १६६५ कोटी रूपयांचा महसूल कार्यान्वयनातून नोंदवला असून आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत ६१ टक्के सीएजीआरने तो वाढला आहे. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीने कार्यान्वयनातून ५२१ कोटी रूपयांचा महसूल नोंदवला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २६६ कोटी रूपयांचा ईबीआयटीडीए नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत ६० टक्के सीएजीआरने तो वाढला आहे. तिने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत १२७ कोटी रूपयांचा ईबीआयटीडीए नोंदवला आहे. इंडिजेन ही कंपनी मोठ्या प्रमाणावर नफ्यात असलेल्या अत्यंत दुर्मिळ डिजिटल प्रथम कंपन्यांपैकी एक आहे. तिने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १६३ कोटी रूपयांचा करोत्तर नफा नोंदवला. आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत ८१ टक्के सीएजीआरने तो वाढला आहे. तिने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत ८६ कोटी रूपयांचा करोत्तर नफाही नोंदवला आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, जे. पी. मॉर्गन इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) हे इश्यूसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
डीआरएचपी लिंक: https://investmentbank.kotak.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: