चिंचवडगाव : गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण (VIDEO)

 


चिंचवड : माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच गोखले हॉल, चिंचवडगाव येथे  झाला.

गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अथर्व गीतेश पाटील यांना मिळाला. त्यांनी  पर्यावरणपूरक वस्तूपासून चाळीतील जनजीवनाचा देखावा तयार केला होता. द्वितीय क्रमांक मयूर विजय हरसुले यांना मिळाला. त्यांनी  केदारनाथ मंदिर प्रतिकृती तयार केली होती.  तृतीय क्रमांक रुपाली राकेश नल्ला यांना मिळाला. त्यांनी पुठ्ठ्यापासून लाकडासारखे दिसणारे मखर बनविले होते.

गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा प्रदीप गुंजाळ यांना मिळाला. त्यांनी  १२ जोतिर्लिंग दर्शन १६ सोमवार उद्यापन सोहळा हा देखावा केला होता, द्वितीय क्रमांक सुनीता अजित डोईफोडे यांना मिळाला. त्यांनी  जागरण गोंधळ व ग्रामीण जनजीवन देखावा केला होता. तृतीय क्रमांक रेश्मा किरण चाचर यांना मिळाला. त्यांनी आकर्षक मांडणी करत महादेव पिंडीचा देखावा सादर केला होता.
गौरी सजावट स्पर्धेतील प्रथम तीन क्रमाकांना सोन्याची नथ व पैठणी तसेच गणपती सजावट स्पर्धेतील प्रथम तीन क्रमाकांना गणपती मूर्ती व विशेष भेट देण्यात आली. तसेच प्रत्येकास सहभागाबद्दल बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बलकवडे यांनी केले तसेच आभार भाग्यश्री देशमुख यांनी मानले. शैला जमखंडी,रेणुका बारसावडे, प्रियांका दळवी,पायल दळवी, नंदिनी भेगडे,स्वाती पवार, हेमा कस्तुरे, अनिता कोळसुने, स्वाती चौधरी,पुष्पा पाटील आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

चिंचवडगाव : गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण (VIDEO) चिंचवडगाव : गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/११/२०२२ १२:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".