पिंपरी चिंचवड : थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात!



पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मालमत्ता धारकांबाबत कठोर  पाऊले उचलण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापैकी १२ मालमत्ता धारकांनी त्वरीत ९२ लाख ९३ हजार ४७३ रुपयांचा थकीत कर महापालिका तिजोरीत जमा केल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली. 

शहरातील ५० हजारांपुढे थकबाकी असणाèया २६ हजार ७६०, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१ तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या ३ हजार ८५० अशा ३१ हजार  ९७१ मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिल्या आहेत. तसेच या मालमत्ता धारकांकडे तब्बल ६३१ कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. तसेच जप्तीची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही यांनी दिला. पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ७९ हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत ३६२ कोटी रूपये कराचा भरणा केला आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.  चिखली आणि भोसरीमध्ये थकबाकी असलेल्या औद्योगिक आणि बिगरनिवासी २१ मिळकती जप्त केल्या आहेत. 

यापैकी १२ मिळकत धारकांनी त्वरीत ९२ लाख ९३ हजार ४७३ रुपयांचा थकीत कर भरला आहे. ९ मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५ जणांनी कराचा भरणा केला आहे. उर्वरित चार मालमत्ता धारकांनी अद्याप कराचा भरणा केला नाही. 

मालमत्ता जप्त केल्यापासून २१ दिवसांत कर न भरल्यास या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

१३६१ मालमत्ता होणार जप्त!

पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१ मालमत्ता आहेत. थकबाकी असलेल्या या मालमत्तांची ऑक्टोबर महिन्यातच जप्ती करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील ५० टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असणाèया सोसायट्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे. 

या महिन्यात या ठिकाणी जप्ती करण्याचे काम सुरु केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड : थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात! पिंपरी चिंचवड : थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात! Reviewed by ANN on १०/०४/२०२२ १०:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".