पिंपरी : शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संवाद सोसायटीधारकांशी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्नांवर सत्ता मिळवावी, या हेतूने झपाटलेल्या भाजपचे एकनाथ पवार यांना पोटशूळ झाला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी केला आहे.
शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी आज बुधवारी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते रणसुभे यांनी प्रसिध्दी पत्रकातून टिका केली आहे.
प्रवक्ते रणसुभे यांनी केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतानादेखील सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवता आले नाही. म्हणूनच शहर राष्ट्रवादीच्या वतीने संवाद सोसायटीधारकांशी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत, यात एकनाथ पवारांना दुःख होण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
पालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात लाचखोरी, खंडणीखोरी, भ्रष्टाचार करून स्वताःची घरे भरणाèया भाजपवाल्यांनी टीका करण्याऐवजी आत्मपरिक्षण करावे. असा टोला त्यांनी लगावला आहे. येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला जनता थारा देणार नाही. त्यामुळेच त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे असेही ते म्हणाले.
Reviewed by ANN
on
१०/०४/२०२२ १०:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: