पनवेलमध्ये पीएफआयच्या सचिवासह तिघे अटकेत!; राज्य एटीएसची कारवाई

 


पनवेल :  राज्य दहशतवादी विरोधी पथकाने गुरुवारी पनवेल येथे कारवाई करत पी.एफ़.आय. या केंद्रसरकारने बंदी घातलेल्या संघटनेच्या पनवेल शाखेच्या सचिवासह अन्य तिघांना अटक केली.

 पनवेल शाखेचा सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद याच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान यांना राज्य दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पी.एफ़.आय.वर केंद्रसरकारने बंदी घातली आहे.  असे असतानाही या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. पनवेलमध्ये त्यांची बैठक झाल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती.त्यामुळे  ही कारवाई  करण्यात आली आहे.

पनवेलमध्ये पीएफआयच्या सचिवासह तिघे अटकेत!; राज्य एटीएसची कारवाई पनवेलमध्ये पीएफआयच्या सचिवासह तिघे अटकेत!; राज्य एटीएसची कारवाई Reviewed by ANN news network on १०/२१/२०२२ ०३:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".