इंदापूर नगरपरिषद ’कसायांना’ धार्जिणी! बेकायदेशीर कत्तलखान्यांकडे काणाडोळा!! मानद पशुकल्याण अधिका-याने दिली नोटीस

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर हे शहर गोहत्या आणि गोमांस विकी, निर्यातीचे  आंतरराष्ट्रीय केंद्र बनले असून गोवंश हत्याबंदी कायदा धाब्यावर बसवून या शहरात आठ ते दहा कत्तलखाने सुरू आहेत. यामध्ये गोवंशाची निर्ममपणे कत्तल सुरू असून याला आळा घालण्यासाठी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी इंदापूर नगरपरिषदेला कायदेशीर नोटीस दिली आहे.  
या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यास नगरपरिषदेच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर नगरपरिषद हद्दीमध्ये पोलिसांच्या सहाय्याने वेळोवेळी धाडी टाकून कसाई गल्ली मध्ये कारवाई केलेली आहे. इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये कत्तलखान्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हे नोंद झालेले आहेत. २०१९ पासून आतापर्यंत गुन्हे नोंद होत असताना प्रत्यक्ष इंदापूर नगरपालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही.
स्वामी पुढे म्हणाले, इंदापूरमधील अवैध कत्तलखान्यामध्ये गाई, बैल, वासरे, म्हशी व शेती उपयोगी जनावरे आणली जातात. अवैध कतलखान्यात त्या जनावरांची क्रूरतेने कतल करून ते गोमांस पुणे, मुंबई येथे पाठविले जाते. किंवा विजापूर, बंगळुरू मार्गे ते  व्हिएतनाम, दुबई येथे निर्यात केले जाते. त्यामुळे इंदापूर हे गोमांस विक्रीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले असून ‘अल कबीर’ ही आंतरराष्ट्रीय कंपनीद्वारे इंदापूर मधील गोमांसाची विक्री जगभर केली जाते. सध्या कसाई मोहल्ल्यात भिंतीचे बांधकाम व पत्र्याची शेड असे ८ ते १० अशा स्वरुपाचे कत्तलखाने सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही. येथील कत्तलखाना मालक गुन्हे दाखल होऊनसुद्धा खुलेआम फिरत आहेत.
त्यामुळे नगरपरिषदेविरुद्ध याचिका दाखल करण्यापूर्वी नोटीसीद्वारे नअंतिम इशारा देण्यात आला आहे. 
इंदापूर नगरपरिषद ’कसायांना’ धार्जिणी! बेकायदेशीर कत्तलखान्यांकडे काणाडोळा!! मानद पशुकल्याण अधिका-याने दिली नोटीस इंदापूर नगरपरिषद ’कसायांना’ धार्जिणी!  बेकायदेशीर कत्तलखान्यांकडे काणाडोळा!! मानद पशुकल्याण अधिका-याने दिली नोटीस Reviewed by ANN news network on १०/२१/२०२२ ०२:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".