पिंपरी : रावेत येथे टप्पा ३ ला पाणीपुरवठा करणारी १४०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाईन बुधवारी अचानक फ़ुटल्याने पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद करून पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज आणि उद्या संपूर्ण शहरात सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. उद्या रात्री पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे; असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.
पिंपरी चिंचवड : रावेत येथे जलवाहिनी फ़ुटल्याने आज आणि उद्या पाणीपुरवठा विस्कळीत
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०१:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०१:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: