पुणे : पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेते माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण,मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण व दोन मुली असा परिवार आहे.
पुण्याच्या राजकारणातील वजनदार नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी एकेकाळी खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते.
ते दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदारकी भूषविली होती.
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०५:३९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०५:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: