लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता लोणावळा : मावळ तालुक्यातील लोहगड येथून शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली एक अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. हर्षदा राजेश गायखे ( वय 17 , रा . लोहगड , ता . मावळ , जि . पुणे) असे बेपत्ता मुलीचे नाव असून याप्रकरणी तिचे वडील राजेश गायखे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे . लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड गावातील ही मुलगी भाजे मळवली येथील संपर्क लिली इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असून शाळेत जाण्यासाठी ती शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास बाहेर पडली. मात्र ती अद्याप घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची फिर्याद दिली आहे. ती रंगाने सावळी असून तिची उंची साधारण 4 फूट आहे . तीच्या अंगात सेनादलासारखा गणवेश आहे .ही मुलगी कुठे आढळल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.
लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता Reviewed by ANN on ९/०५/२०२२ १०:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".