कविता सुचण्यासाठी शब्दसंग्रह आणि चौकस दृष्टीकोन हवा!, सौमित्र यांचे मत

कविता सुचण्यासाठी शब्दसंग्रह आणि चौकस दृष्टीकोन हवा सौमित्र यांचे मत पिंपरी : आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाचे क्षण वेचत वेचत जगता आले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तसेच समाजातील विविध घटकांबाबत घडणार्‍या घटनांचे विश्लेषण, पडसाद कवींच्या कलाकृतीत दिसतात. माझे बालपण समुद्रकिनारी गेले. त्यामुळे लाटा कविता सुचली. एका नाटकाचा सेट उभारताना लग्नं ही रचना केली. कविता कुठेही सुचू शकते अगदी स्मशानातही पण तिची प्रक्रिया मनात अनेक दिवसांपासून सुरू असते. उत्कृष्ट कविता सुचण्यासाठी आणि सादरीकरणासाठी शब्दं संचयासह संवाद कौशल्य आणि चौकस दृष्टीकोन पाहिजे. अभिनय आणि कविता या माझ्या दोन सादरीकरणाच्या बाजू आहेत. कवितेला सन्मान मिळवून देण्यासाठी भोसरी कला क्रीडा मंचच्या वतीने सतरा वर्षे कवी संमेलन आयोजित करण्यात येते हे खूप गौरवास्पद आहे. अशा शब्दात कवी व अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. निमित्त होते भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भोसरी महोत्सव 2022’ मध्ये आयोजित केलेल्या काव्यामैफिलीचे. शुक्रवारी कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे कार्यक्रमाचे संयोजक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे, विजय फुगे तसेच भाजपा शहर सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, महादेव गव्हाणे, सुनंदा फुगे तसेच रोहिणी भोंडवे,भरत लांडगे, नंदकुमार दाभाडे, भाऊसाहेब डोळस, निवृत्ती फुगे, संदीप राक्षे, विजय लांडगे, किरण लांडगे, नंदू लोंढे आदींसह सहभागी कवी शोभा जोशी, सुरेखा कटारिया, कमल आठवले, सुरेश डोळस, विजय ओव्हाळ, विनायक विधाटे, दत्तात्रय इंगळे, रामदास हिंगे, संजय बेंडे, अमरदीप मखमले, कमल आठवले, दिव्या भोसले आदी उपस्थित होते. जेष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी ‘जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे, ती तशी आहे, तरी हा गडी बेफाट आहे.’ या कवितेबरोबर ‘मी म्हातार्‍याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो’ या रचना सादर केल्या. स्वागत अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी केले, सूत्र संचालन श्रीकांत चौगुले आणि दिगंबर ढोकले यांनी केले. आभार विजय फुगे यांनी मानले.
कविता सुचण्यासाठी शब्दसंग्रह आणि चौकस दृष्टीकोन हवा!, सौमित्र यांचे मत कविता सुचण्यासाठी शब्दसंग्रह आणि चौकस दृष्टीकोन हवा!,  सौमित्र यांचे मत Reviewed by ANN on ९/०५/२०२२ १०:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".