भाजप राष्ट्रवादीला ’टार्गेट’ करत आहे! : जयंत पाटील यांचा आरोप

पिंपरी : भाजपने राष्ट्रवादीची धास्ती घेतली असून त्यामुळेच राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ केले जात आहे असा आरोप सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यनोंदणीचा आढावा घेण्यासाठी शहरात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, संजोग वाघेरे , विनोद नढे, राहुल भोसले, शाम लांडे आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते एकसंघपणे काम करत आहेत. त्यामुळे आपले संख्याबळ विधीमंडळात कमी होईल की काय अशी चिंता भाजपला वाटत आहे. 123 संख्याबळ असणारा पक्ष 105 वर आला. आगामी काळात ते 80 च्या खाली येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा जर पुण्यात देण्यात आल्या असतील, तर ही अतिशय गंभीर घटना आहे. भाजपची राज्यात सत्ता असताना हे अधिकच गंभीर आहे. सरकारचे लक्ष कमी पडले, अशा घोषणा देताना त्यांना भीती वाटली नाही.
भाजप राष्ट्रवादीला ’टार्गेट’ करत आहे! : जयंत पाटील यांचा आरोप भाजप राष्ट्रवादीला ’टार्गेट’ करत आहे! : जयंत पाटील यांचा आरोप Reviewed by ANN news network on ९/२७/२०२२ ०२:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".