चिंचवड : महासाधू श्री मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवडनगरीमध्ये चिंचवड नवरात्र महोत्सवात आज आदिशक्तीची - साडेतीन शक्तीपीठांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये गजमहल प्रतिकृती उभारली आहे. यामध्ये भव्य सुवर्ण गजमहाल प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन देखावा तयार करण्यात आला आहे. गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात केली होती. आज सलग 10 वर्षापासून ही महोत्सव परंपरा सुरू आहे.
सायंकाळी 5 वाजता देवीची स्थापना करण्यात आली. आरती भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप व चिंचवड देवस्थान ट्रस्टवे विश्वस्त मंदार देव महाराज आणि त्यांच्या अर्धांगिनीच्या हस्ते झाली. त्यानंतर स्वानंद धुपारती मंडळाची धुपारती झाली.
चिंचवडमधील माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रस्त्यावर नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड नवरात्र महोत्सवास प्रारंभ
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ १०:०८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ १०:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: