भोसरी : भोसरीतील ओम हॉस्पिटल येथे जागतिक हृदयदिनानिमित्त 17 ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
ओम हॉस्पिटलचे डॉ. सुनील अग्रवाल हे पुणे शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आहेत, या शिबिराची माहिती देताना ते म्हणाले की, आज धकाधकीची जीवनशैली, तणावपूर्ण जीवन आणि जंक फूड यामुळे हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच हृदयविकाराचा खर्चही जास्त असतो, त्यामुळे बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करून उपचार करत नाहीत. हे लक्षात घेऊन ओम हॉस्पिटल, भोसरी यांनी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदयदिनानिमित्त मोफत हृदयरोग तपासणी व माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया यासह हृदयतपासणी मोफत करण्यात येणार आहे. अँजिओग्राफी 5 हजार रुपयात केली जाईल. तर, सिंगल स्टेंट अँजिओप्लास्टी फक्त 75 हजार रुपयात केली जाणार आहे. मेडिक्लेम, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मोफत अँजिओेप्लास्टी उपचार केले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ओम हॉस्पिटलच्या कॅथलॅबमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया आणि औषधोपचार केले जातात. पुणे, पिंपरी चिंचवड, देहू, आळंदी, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सुनील अग्रवाल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 91-8888825601/09/04 वर संपर्क साधावा.
जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ १०:११:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: