सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२
महापालिकेतर्फे सद्भावना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
महापालिकेतर्फे सद्भावना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने सोमवारी ऐक्य पंधरवड्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा कार्यक्रम झाला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 2022 हा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून 20 ऑगस्ट 2022 ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना होत्या.त्यानुसार हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास हिंदु धर्मजागरण संस्थेचे संयोजक माधव खोत, मौलाना कारी अब्दुल इकबाल, बौद्ध भन्ते धम्मानंदजी आणि शिख धर्मगुरू भाई दर्शनसिंग तसेच महापालिकेचे उप आयुक्त संदीप खोत आदी उपस्थित होते.
मानवी मूल्ये सर्वात श्रेष्ठ असून त्याची जपणूक करण्यासाठी आपसात सद्भावना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यातून सक्षम, सुदृढ आणि एकसंघ राष्ट्राची निर्मिती होते. भारताला असेच बलशाली राष्ट्र बनविण्याकरीता प्रत्येकाने सद्भावना वृद्धींगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे असा सूर सामाजिक ऐक्य पंधरवडा निमित्ताने झालेल्या विशेष कार्यक्रमात उमटला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा