सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२
लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता
लोहगड येथून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता
लोणावळा : मावळ तालुक्यातील लोहगड येथून शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली एक अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे.
हर्षदा राजेश गायखे ( वय 17 , रा . लोहगड , ता . मावळ , जि . पुणे) असे बेपत्ता मुलीचे नाव असून याप्रकरणी तिचे वडील राजेश गायखे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे .
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड गावातील ही मुलगी भाजे मळवली येथील संपर्क लिली इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असून शाळेत जाण्यासाठी ती शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास बाहेर पडली. मात्र ती अद्याप घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची फिर्याद दिली आहे.
ती रंगाने सावळी असून तिची उंची साधारण 4 फूट आहे . तीच्या अंगात सेनादलासारखा गणवेश आहे .ही मुलगी कुठे आढळल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा