शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी प्रकाश भिलारे

पुणे : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्ष पदी प्रकाश भिलारे बिनविरोध निवडून आले आहेत. या पदासाठीची निवडणूक शनिवार २४ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन पुणे येथे झाली.पुणे विभागातून एकूण ३ उमेदवार उभे होते. संजय बोराटे,दुर्गादास जाधव या उमेदवारांनी प्रकाश भिलारे यांना संघटनेच्या एकजुटीचा संदेश देत पाठिंबा दिला. पुणे विभागातील सर्व ५ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून भिलारे यांना मतदान केले. शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव देशमुख , राज्य पदाधिकारी, सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भिलारे यांचे अभिनंदन केले.बाळासाहेब जाधव, जगन्नाथ लकडे, अमोल पोतदार,निरंजन काकडे, सुभेदार मेजर(नि) नरेंद्र गायकवाड,बर्गे,पवार,शहाजी जगताप, कुलकर्णी,शरद शिंदे, प्रमोद जाधव, शिवाजी माने, समाधान पाटील,संजय बोराटे,नवनाथ इंदलकर, दयानंद अनपट, नितीन मतकर, विकास तांदळे, माधवराव दुधे पाटील, शिवाजी साळुंखे,नारायण पाटील, सुनील खामकर,सुरेश पाटील, सुनिल देसाई, निवडणूक प्रमुख कमलाकर शेटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी विलास घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ही संघटना बारा वर्षांपासून 36 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे . माजी सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांचा एकजुटीने पाठपुरावा करण्याचा संकल्प केल्याचे भिलारे यांनी यावेळी सांगितले
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी प्रकाश भिलारे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी प्रकाश भिलारे Reviewed by ANN on ९/२८/२०२२ ०१:०७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".