डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन पिंपरी : संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते 67 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी संत साहित्यावर सुमारे ५० पुस्तके लिहिली आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण कार्यालयात जनसंपर्क अधिकारी असलेले देखणे 2014 साली निवृत्त झाले होते.
डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन Reviewed by ANN news network on ९/२६/२०२२ ११:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".